Monday, 30 October 2017

तू विसरलीस कुठे होतीस मला आठवायला

तू विसरलीस कुठे होतीस
मला आठवायला
तेंव्हा वाट पहात उभी असायचीस
पण वेळ नव्हता साधा
तुला थांबायला
होत भरपूर बोलायचं तुला
पण शब्द सुचत नव्हते
त्या क्षणाला
मनात बरच दडवलं होतं तू
पण धाडस नव्हतं तुझ्यात
मन मोकळ करायला
त्यात सतत नजर शोधत होती तुझी
पण सापडत नव्हतं
आली होती जे शोधायला
पण भेटल्यावर मी मात्र
लक्ष वेधण्यासाठी दुर्लक्ष करत होती तू
माझ्या असण्याला
नेहमीचच तुझ हे वागण पाहून
बदललं मी स्वतःला
आणि स्वतःच लागलो मी
तुला आठवायला
वाट पहात उभी असायचीस तू
तेंव्हा मुद्दाम थांबायचो
तुला सोबत द्यायला
तुला सुचत नव्हत पण बोलायचं होत भरपूर
म्हणून मीच होतो बोलत
तुला शब्द सुचवायला
त्यावेळी मनात बरच काही होत तुझ्या
म्हणून मी वाट झालो ती
तुझ मन मोकळ व्हायला
सापडत नव्हतो जेंव्हा डोळ्यात तुझ्या
तेंव्हा मी यायचो समोर
तुझ्या नजरेतला मी शोधायला
काळजी आहे तुझी, जगात कुठे ही तू असताना
गरज नाही सखी तुला
लक्ष माझं वेधायला
तू विसरलीस कुठे होती
मला आठवायला
आज हि येत हसू ओठी
नकळतच तुला
मला आठवताना
तुझा हा विसरण्याचा सखे
ओळखून आहे मी बहाणा
फक्त विसरतेस तू मला
मी समोर असताना
पण न विसरता आठवते तू मला
सखी मी नसताना
मला विचारशील तर
मनातच आहेस तू
म्हणून विसरतो कुठे मी
तुला आठवायला
पण आजही तू सांगतेस
न विसरता मला
"सॉरी,हा, विसरले मी
तुला सांगायला "
                                         ----नितीन खंडारे




No comments: