ट्विटर , फेसबुक च्या जगात
हरवलोय आपण नकळतच
गूगलवर शोध घेतोय खूपच
पण सापडत नाही आपणच
व्हाट्सअपच खूळ डोक्यात
म्हणून लक्ष असत सतत त्यातच
कोणी काय लिहिलंय आज
अर्धा वेळ खपतो त्यातच
मित्र बनवले त्यावर,खूप अप्रूप त्याच
पण असतात का हो मित्र ते आपले खरंच ?
त्या जगात हरवून सतत
विसरलोय का आपले आप्तच ?
काढतो सेल्फी आपण हसत,पाऊट दाखवत
बघणारा असतो कॅमेरा फक्त,दुसरा नसतो कोणच
एकटेपण त्यात असतं पण आपल्याला नाही दिसत
कारण फुलाहून वेगळी पाकळी भासते या जगातच
Virtual जग आहे ते
नव्हे त्यात खऱ्या जगाचा टच
मोबाईल दिवसभर असतो शेजारी जवळच
पण मायेचा टच भेटतो कोण्या आपल्यातच
समजू नका तंत्रज्ञानाच्या विरुद्ध आहे मी कधीच
करू योग्य वापर त्याचा,संयम ठेवून मनावरच
कारण जशी अणुऊर्जेचं तंत्रज्ञान देते वीज
तशीच घडवून आणू शकते विश्वात विनाश तीच
म्हणून केंव्हा ,कुठे कस ते धन ज्ञानाच वापरायच
ठरवायचय सदविवेक बुद्धीने फक्त आपले आपणच
---नितीन खंडारे
No comments:
Post a Comment