Saturday, 24 December 2022

Screenshot ची कॉपी

 एक  स्क्रीनशॉटची कॉपी तुला हि पाठवेल हाच विचार करून डोक्यात 

कि ते विचार एकांतपणात झालेत  कॉपी ,माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात

मोठा मोठा आवाज त्या विचारांचा घुमतोय , गुंजतोय माझ्या या मनात 

त्यांना भेटायचं आहे , सांगायचं आहे काहीतरी तुला मोजक्या अशा शब्दात

हेच ते शब्द उतरतात कीबोर्ड वरून फोनच्या एका space च्या कप्प्यात 

पण माझ्या मनाची आर्तता अन आवाजाची तीव्रता दिसणार नाही तुला त्याच्यात 

तरी पाठवावासा वाटतो त्याच्या स्क्रीनशॉट ची कॉपी तुला या क्षणात 

नितीन खंडारे 

No comments: