Tuesday, 19 December 2017

पाण्यासारख मन

बर्फासारखं एकाजागी जमून
थांबायचंय नाही मला

मनाचा झालेला बर्फ वितळवून
पाण्यासारखं खळखळ वाहायचंय मला

मनाचं गढूळ डबक बनून साचणं
जमणार नाही कधी या मनाला

डोंगर दऱ्या खोऱ्या पालथ्या घालतं
फक्त पुढे पुढेच चालायचंय मला

हिंडायचंय हे जग , अनुभवायचं रोज
माझ्यातला मी नव्याने मला

आणि शेवटी खाऱ्या समुद्राला भेटून
गोड मनाने गोड बनवायचंय त्याला
---- नितीन खंडारे

No comments: