Thursday, 28 December 2017

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू
कळली आहेस मला तू

खुललेला चेहरा ,
गुलाबी हसू
निसर्गाने पांघरलेलं
सुंदर रूपच जणू
पाहून डोळ्यातला
निरागस आनंदी ऋतू
अनुभवतो मी सुंदरसा
वसंत ऋतूचा बहर तू

मनातून हळवी
आहेस जराशी तू
मनातल्या नात्यांचा ओलावा
डोळ्यात लागतो दिसू
ज्या क्षणी व्यक्त होतेस
डोळ्याच्या ओल्या पापण्यातून तू
भासतो  त्यावेळी वर्षा
ऋतूतील हळवासा नभ तू

नाकावरचा राग तुझा
जेंव्हा लागतो मला कळू
तेंव्हा कळत नाही
राग तुझा कसा मी शमवू?
कळत नाही डोळ्यातला
तो वणवा कसा शांत मी करू?
जाणवतेस तेंव्हा ग्रीष्म ऋतूतला
सतत वाढणारा पारा तू

दूर जाताना वाटते भीती
कुठे तरी आपण हरवू
आयुष्य भासे तेंव्हा
रुक्ष निसर्गच जणू
तेंव्हा डोळ्यातले भाव तुझे
सांगतात इथेच थांबू
पण दूर असताना ही आठवून
ते भाव दिसे शरद ऋतूची पौर्णिमा तू

जेंव्हा कधी मी चिडतो
पाहतो तुला रागावू
तेंव्हा तुझ्या शब्दांच्या गारव्याने
राग लागतो माझा निवळू
डोळ्यातला तो थंडपणा
जरा दे मला अनुभवू
आठवू दे थंड असा हेमंत-शिशिर ऋतू

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू
खरचं नव्याने उलगडली आहेस मला तू....

                                                    -----नितीन खंडारे






No comments: