Saturday, 16 December 2017

जगणं शिकतोय तुला पाहून

जगण्यातला आनंदच
बसलो होतो मी गमावून
पण आता जगणं नव्याने
शिकतोय मी तुला पाहून

मस्ती, धिंगाणा, पागलपंती
गेलोच होतो मी विसरून
पण आठवलं ते सगळं
तुझा मॅडनेस अनुभवून

रोजचंच होत ते जगणं
मन स्वतःच मारून
पण जगायचं कसं सांगितलं
तू ते प्रत्यक्षात दाखवून

जगण्यातला बिनधास्त पणा
जाणवला मला तुझ्यातून
जगणं कसं सुंदर असावं
ते दिसलं मला त्यातून

रस्ता मी भटकलो भरपूर
जीवनाचा खरा आनंद सोडून
भटकता भटकता सापडला
मला नकळतच तुझ्या रूपातून

कृत्रिम जगात जगत होतो मी
जगण्याचा खरा अर्थ हरवून
दिसला तुझ्या डिकशनरीत तो
सांग अर्थ त्याचा कधीतरी
मला समजावून

                                                      --- नितीन खंडारे

No comments: