Saturday, 24 December 2022

डोळे

 एक वेगळासा निरागसपणा होता त्या सतत शोधणाऱ्या डोळ्यात 

नीट बघितलं तर प्रामाणिकपणाही  दिसत होता त्या बघण्याच्या दृष्टिकोनात 

भावनेचा ओलावाही जाणवत होता,वाहत होता त्या नजरेच्या डोहात

बदलले नाहीत कधीही  ते डोळे बदलणाऱ्या काळाच्या ओघात

पण तळमळत शोधत आहेत तेच डोळे अशाच प्रकारचं प्रेम या जगात 

नितीन खंडारे 

No comments: