Wednesday, 17 January 2018

कसं भेटाव तुला ?

मैत्रिणीपासून दूर जाणं
तुला कधीही जमत नाही
माझे हरामखोर मित्रपण
कुठेच एकट सोडत नाही
भेटावं म्हटलं एकांतात तरी
निवांत कुणी भेटू देत नाही
ऐनवेळी ओळखीची माणसे
अशी कशी भेटतात हेच कळत नाही
अरे , तू इकडे, हि कोण हे प्रश्न विचारत
आपला पिच्छा काही सोडत नाही
सांग आता ,
जगाच्या पाठीवर कुठे कसं भेटाव तुला
हेच आता मला कळत नाही
हेच आता मला कळत नाही
                                                      --- नितीन खंडारे

No comments: