Monday, 18 May 2020

आई - बाबा

सतमार्ग कधी कळला नसता
कदाचित रस्ता ही चुकला असता
जर नसते तुमचे मार्गदर्शन ना संस्कार ,
ना खाल्ल्या असत्या आमच्यासाठी त्या खस्ता
तर काय झालं असतं माझं जर तुम्ही
कदाचित माझे आई बाबा जर नसता
असे अनेक प्रश्न पडतात
मनात येतात, विचार करता करता
आहात आई बाबा तुम्ही माझे सांगेल गर्वाने या जगाला
चालेल नेहमी तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जगता जगता
असेल कुठे माहित नाही तो परम परमेश्वर
अन या संपूर्ण जगाचा, विश्वाचा दाता
पण आभार मानतो त्याचे कारण दररोज भेटतो
तुमच्या रुपात आई बाबा जगाचा तो कर्ता
--- नितीन खंडारे

Sunday, 17 May 2020

ना जाणे का? ब्रह्मांड कार्य आणि जीवन संबंध

पृथ्वी का फिरते स्वतः भोवती अन सुर्या भोवती या अवकाशात?
गुरुत्वाकर्षणाद्वारे सृष्टीला जगवायचा खेळ न जाणे का वाटतयं  रंगला त्यात?
न जाणे पृथ्वी का तरंगतच फिरते ना पडते खाली ना उडते वरती या सौरमंडलात?
कारण जीवन समतोल साधण्यासाठी तरंगत फिरते पृथ्वी आकाशगंगेत गुरुत्वाकर्षणामुळे  वाकलेल्या time space च्या fabric च्या फंदात
भीती का नसते पृथ्वीला या पडण्याची, हरवण्याची या अथांग ब्रह्मांडाच्या पसार्यात?
कारण माहित आहे तिला चांगल्या परिक्रमणाच्या मार्गावर कोणी तरी आहे तिचा हा तोल सांभाळण्यात (space time and gravity)
फिरते सुर्याभोवती पृथ्वी आणि फिरतो चंद्र पृथ्वी भोवती आणि फिरते आकाशगंगेच्या मध्यबिंदू भोवती ही आपली सौरमाला या क्षणात
फिरतात असेच ग्रह तारे असे बिंदू जोडत,नाते गुंफत अन वाहून नेतात स्वतः ला सगळे प्रचंड अश्या ब्रह्मांड कार्यात
तसचं कोणाच जीवनही आपल्या भोवती, आपलं नात्यांभोवती आणि इतरही आयुष्य  फिरत असतील या विश्वात
समतोल साधतोय आपण जीवन गंगेच्या प्रवाहात या, अडकलोय वेळेच्या या बंधात
नवी माणसे ,नवी नाती ,मार्ग नवे भेटत जातात आयुष्याची परिक्रमा करता करता या जीवन प्रवासात
त्या time space वरच्या विश्वासाने पृथ्वी झोकून देते स्वतःला तसेच का झोकून देतो जीवन आपण त्याच्यावरच्या विश्वासात ?
पण त्यामूळे ना पडण्याची भीती न काही गमवायची, भेटत जातात मार्ग नवे चालता चालता विश्वानिर्मात्याच्या आधारात
गणित उलगडण अजून बाकी आहे ब्रह्मांडाच,पण त्याचा नियम आपल्या जीवनाला लागू आहे वाटते या अंतर्मनात
खेळ हा कोणता आहे हे कळले न कुणा पण नियम विश्वाचे हे गम्मत आहे सूत्र त्याचे हळूवार उलगडण्यात

  • --- नितीन खंडारे

Thursday, 14 May 2020

थांबणे नको आता

थांबणे नको आता
चालणेच हवे आहे
दूर जाता जाता
माझ्या जवळ मीच आहे
नवे जग जोडता जोडता
जुने सोडणे भाग आहे
पुढे चालता चालता
हात द्या त्यांना जो सोबत आहे
जो नाही बरोबर आता
त्याला आठवणे व्यर्थ आहे
कुठे ही जात नाहीत त्या वाटा
भेटते पुन्हा तुला जे तुझेच आहे
जे आहे त्यांना सोबत घेता
फक्त आपल्याला लढायचे आहे
जीवनाच्या रणांगणात येता
लढने हे कर्म प्राप्त आहे
--- नितीन खंडारे

Monday, 4 May 2020

स्त्री आदर

आई , बहिण, मैत्रिणींच नातं बोलून सांगता येत नाही आहेत स्पैशल किती!
ना वाव, ना दाद याची अपेक्षा ठेवता त्या राबतात न थकता  कुटुंबासाठी
पण आपलेच न विचार करता,रागात, त्रास देतात, वार करतात का त्यांच्या मनावरती ?
आपलं महत्व वाढाव म्हणून की कोणा दुसर्याचा राग काढता का हो तुम्ही तिच्या वरती?
घराला जोडणारी ती,कधी वाचा तिला, महत्व जाणा तिचं,जीवन घडवणारी, संस्कार पेरणारी शक्ती
त्यांना समजून घ्या, करा मोकळं मन, ओळखा त्यांची खरी मनाची स्थिती
बघा, हळू हळू उलगडेल त्यांच कोडं, आणि नंतर समजेल तुम्हाला ती
--- नितीन खंडारे

नातं Quarantine च्या काळात

आता हे चार भिंतींच घर
वाटतय आज जिवंत
नात्यांना ही गुलमोहर फुलला
ना राहिली मनात कोणती खंत
रुसवे , फुगवे होतायेत नात्यात
पण फुटला त्यांना नवा मधुर कंठ
जगतोय दिलखुलास मन आतून
बाहेरच वातावरण असून ही अशांत
नात्यांच्या विश्वात आज गरजा आवरून
तडजोड करुनही जगतोय आपण निवांत
जरी स्वतंत्रता हरवलीय आज फिरण्याचे
पण तरी भेटले ते स्वातंत्र्य कैद अशा नात्यांत
--- नितीन खंडारे

Sunday, 3 May 2020

जगण्यावरती

कोणाच्या मनाशी खेळणं, दुर्लक्ष करुन
लक्ष्य वेधण सोपं वाटतं कोणासाठी (१)
पण
माहित नाही त्यांना तेच खेळतात स्वतः शी
गमावतात सर्व या जीवनाच्या वाटेवरती (२)
भटकलेल्या अशांना भेटत नाही मार्ग,
अडकतात भुलभुलैयात,हरवून खरी नाती(३)
जरी या खोट्या जगण्यात वाटतं असेल,
भासत असेल सुख त्या क्षणापुरती (४)
नष्ट होईल हे क्षणभंगुर सुख, मिसळेल
स्वार्थाच्या मातीत, देईल मनाला ती अशांती(५)
समजून घ्या, अर्थ द्या जीवनाला,
जगू नका जीवन तुम्ही जनावरांसारखी(६)
हळू, हळू समाधान लाभेल, होईल शांत मन
जेंव्हा शोधाल तुम्हालाच तुम्ही (७)
मग बघा भटकणार नाही मन हे बावरे या
जीवनरुपी वेड्या वाकड्या वळणा वरती (८)
---- नितीन खंडारे

Tuesday, 28 April 2020

पाण्यासारखं जीवन


पाण्याला रंग नसतो ,
नसतो कोणता ही आकार
रंग, जात धर्म, सीमारेषा नसतात
सांगून जातो पाण्याचा हा प्रवाहकार (नदी)(१)
ज्यात ठेवला तसाच राहतो,
परिस्थितीशी जुळवून तो सगळे नाळ
जैसा देश तैशी वेशभाषा
सांगतो आपल्याला पाण्याचे विविध अवतार(बर्फ-पाणी-वाफ)(२)
मिसळून राहतो, आपलासा करतो
तो सदासर्वकाळ
मित्रत्व, बंधूभावाची भाषा शिकवतो
पाण्याचा गुणधर्म हा निर्विकार (न बदलणारा)(३)
थंड बर्फ होतो तर कधी गरम वाफ
पाहून वेळ न काळ
कधी शांत कधी आक्रमक रहावं
हे शिकवतो पाण्याचे प्रकार (४)
वाहत पाणी व्हावं त्याच्या सारखं
फिरावं आपण सात समुद्रापार
साठ टक्के भाग पाणी आहे या शरीरात
मग कसा विसरुन चालेल त्याचेच हे विचार (५)
----- नितीन खंडारे  

Monday, 6 April 2020

संतुलन


कमी न जास्त संतुलन असावं आपल्या जगण्यात
तोल ढासळतो जर नसेल ताळमेळ आयुष्यात

पाणी जास्त असेल तर शरीर घुटमळेल त्या पाण्यात
नसेलच पाणी तर जगणार कसा ,कसा असेल जीव या शरीरात

अग्नी जर प्रमाणापेक्षा वाढल्यास भस्म करील तो सगळे क्षणात
नसेलच जर तो तर नसेल उब, खाण्याची चव नसेल कशात

प्राणवायूच ही तेच, नसेल तर जीव येईल हो धोक्यात
असेल जास्त तर विष होईल, प्राण देणारा, घेणारा ठरेल तो क्षणार्धात

न विचार करता जे काही करतो , तेंव्हा करु शकतो तो स्वतः चा घात
विचार करतच राहिलो तर काहिच करु शकत नाही या जीवनात

जेवणही जास्त विषच ठरतो, खचेल शरीर जर नसेल जेवण या उदरात
असेल संतुलन तरच टिकतो नसेल तर नष्ट होतो आपण या विश्वात

सुर्य आणि पृथ्वीत आहे हो संतुलित अंतर या अवकाशात
नसेल हे अंतर तर जीव सृष्टी होईल भस्म पृथ्वी ओढली जावून सुर्यात

असावे संतुलन आपल्या जगण्याच्या या प्रत्येक श्वासात
डगमगू देवू नका तोल कुठल्याही क्षणिक अश्या स्वार्थात

--- नितीन खंडारे

संतुलन हवय. निसर्गाने संतुलित ठेवलंय सगळं. पण आपण मनुष्य हेच निसर्गाच संतुलन बिघडवतोय. संतुलन हवय. वस्तुत: संतुलनाची आवश्यकता प्रत्येक गोष्टीत हवी. 

Sunday, 5 April 2020

आओ सब मिलकर दीप जलाये

मानव जाति पर संकट है गहराया
देश आज मुश्किल में है आया
त्याग कर सब स्वार्थ मोह माया
ना रखो किंतु परंतु का ये घेरा
मतभेद सब अपने भुलाके
आओ सब मिलकर दीप जलाये

पल पल आज हम पे है भारी
मन्डरा रहा है काल का अंधेरासा साया
दूर करने के लिये ये बुरी छाया
लडना है साथ लेके जगत ये सारा
अपने स्वत्व को भीतर से जगाये
आओ सब मिलकर दीप जलाये

नियम का सब को है पालन करना
अपनी मनमानी का रसूख ना दिखाना
नाजूक है समय इसका ध्यान तू रखना
अपनी नही अपनो के बारे में तो सोचना
मन में देशभक्ती, मानवता का राग बढाए
आओ सब मिलकर दीप जलाये
--- नितीन खंडारे
रसूख - influence
राग - passion

Tuesday, 31 March 2020

Uncertainty Principle - Quantum Physics अन जीवन


Uncertainty Principle जर नसला तर होतो  Quantum Physics च्या विश्वाचा नाश 
Uncertainty नसेल आयुष्यात तर 
नष्ट होईल जगण्यातला अमूल्य असा श्वास
Classical Physics सारखं होईल जीवन 
उलगडण सोप घेवून परिस्थितीच correct मोजमाप
तेंव्हा नसेल कोणता craze धाडसाचा अन 
ना असेल कोणता असा व्याप
उसुक्ता ही संपेल सगळी जर होईल 
जीवन सरळ सोप जगायला
उद्या काय होईल याचा अचूक अंदाज 
आला तर काय अर्थ राहिल जगण्याला
Uncertainty Principle जसा 
संरक्षण प्रदान करतो Quantum Physics ला
तसा Uncertainty जीवनात असेल तर 
देतो तो एक अर्थ छान आपल्या असण्याला
या  Uncentainty Principle मध्येच आहे  हो Quantum Physics च्या खर्या गम्मती ची सुंदर वाट
अन 
या खर्या जीवनात ही Uncertainty Principleच देतो 
नेहमी एक वेगळं वळण अन उसुक्ते ची लाट 
--- नितीन खंडारे 

Tuesday, 24 March 2020

मानवा, का देतोय निसर्गाला तू आव्हान


मानवा, का देतोय निसर्गाला तू आव्हान?
केलय ज्याने सुंदर हे जग निर्माण
प्रश्न आणि उत्तर तो,सर्व गोष्टिंचा तोच सार
उघडतो तोच ज्ञानरुपी खजिन्याचे हो द्वार
घाई कसली विकासाची,करुन पर्यावरणाची धुळधाण
जेंव्हा एका एका टप्यावार उलगडतो ज्ञान तो हळूवार
पण आहे रे तुला फुसका हा कसला अभिमान?
त्यानेच थांबवलय हे जग, ठेव तू त्याच हे भान
कर कर्म तुझे तू फक्त,चांगल्या मार्गावर तू चाल
जे पेरेल तेच उगवेल हा नियम त्याचा हे तू जाण
मानवा, का देतोय निसर्गाला तू आव्हान?
--- नितीन खंडारे 

रुकना है हमे फिर चलने के लिए

रुकना है हमे फिर चलने के लिये
घर पे रहना है घर बचाने के लिये
है कठीन बडा ये समय आज का
खोना है आज, आनेवाले कल के लिये
धीरज ना गवाँ तू इस पल मे अभी
तकलिफ सहनी है बस कुछ पल के लिये
अकेला खुद को ना समझ तू
ये समय भारी है सभी के लिये
कभी संयम छुटे, लगे जब डर तुम्हे
तब सोच परिवार और देश के लिये
कुर्बानी इतनी भी बडी नही है अभी
हम सब साथ है ये जान ले देश तेरे लिये
---- नितीन खंदारे

Tuesday, 11 February 2020

बाबासाहेब

बाबांच्या चष्म्यातून जग
तुम्ही अनुभवलंय का कधी?
मग कळेल कसा त्यांचा संघर्ष
समाज क्रांती आणण्यासाठी?
इतर मुलांपासून वेगळं बाहेर बसुन वर्गाच्या
शिक्षण घेतलय का कधी ?
मग कसं कळेल तुम्हाला काय काय सहन केलय
शिक्षणाच्या महामेरुने तुमच्या साठी?
घश्याला कोरड पडल्यानंतर पाणी पिताना
बाबाना आठवले का कधी?
आठवा,वाचा बाबाना स्वतः कोरडे राहून
जे झिजले समाजासाठी
शिका संघटित व्हा संघर्ष करा
कळलच नाही लोको हो विसरले तुम्ही कधी?
उठा जागे व्हा आता तरी
त्यांनी बघितलेल्या राष्ट्र निर्माणाच्या स्वप्नांसाठी
स्वाभिमान, स्वावलंबनाची शिकवण दिली त्यांनी
आठवणीत नसेल कदाचित  तुमच्या कधी?
जागवा तो स्वाभिमान
धरुन स्वावलंबनाची कास देश विकासासाठी
काही दशका पूर्वीच्या स्त्रियांची स्थिती
आठवते का हो तुम्हाला कधी?
आठवेल कसे तुम्हाला ज्या बाबानी दिले पंख
तिला आकाश भरारी साठी
जाती धर्म भेद होता भयंकर
तेंव्हा ना होता हक्क कधी काळी
समाज कंटक वृत्तीशी लढले ते
 नवा शक्तीशाली समाज घडवण्यासाठी साठी
बाबांच्या चष्म्यातून वाचलय का
भारताच संविधान कधी?
वाचा बाबानाही
धर्म जाती चा चष्मा न घालता राष्ट्रहिता साठी
 ---- नितीन खंडारे