कमी न जास्त संतुलन असावं आपल्या जगण्यात
तोल ढासळतो जर नसेल ताळमेळ आयुष्यात
पाणी जास्त असेल तर शरीर घुटमळेल त्या पाण्यात
नसेलच पाणी तर जगणार कसा ,कसा असेल जीव या शरीरात
अग्नी जर प्रमाणापेक्षा वाढल्यास भस्म करील तो सगळे क्षणात
नसेलच जर तो तर नसेल उब, खाण्याची चव नसेल कशात
प्राणवायूच ही तेच, नसेल तर जीव येईल हो धोक्यात
असेल जास्त तर विष होईल, प्राण देणारा, घेणारा ठरेल तो क्षणार्धात
न विचार करता जे काही करतो , तेंव्हा करु शकतो तो स्वतः चा घात
विचार करतच राहिलो तर काहिच करु शकत नाही या जीवनात
जेवणही जास्त विषच ठरतो, खचेल शरीर जर नसेल जेवण या उदरात
असेल संतुलन तरच टिकतो नसेल तर नष्ट होतो आपण या विश्वात
सुर्य आणि पृथ्वीत आहे हो संतुलित अंतर या अवकाशात
नसेल हे अंतर तर जीव सृष्टी होईल भस्म पृथ्वी ओढली जावून सुर्यात
असावे संतुलन आपल्या जगण्याच्या या प्रत्येक श्वासात
डगमगू देवू नका तोल कुठल्याही क्षणिक अश्या स्वार्थात
--- नितीन खंडारे
संतुलन हवय. निसर्गाने संतुलित ठेवलंय सगळं. पण आपण मनुष्य हेच निसर्गाच संतुलन बिघडवतोय. संतुलन हवय. वस्तुत: संतुलनाची आवश्यकता प्रत्येक गोष्टीत हवी.
No comments:
Post a Comment