Monday, 30 October 2017

तू विसरलीस कुठे होतीस मला आठवायला

तू विसरलीस कुठे होतीस
मला आठवायला
तेंव्हा वाट पहात उभी असायचीस
पण वेळ नव्हता साधा
तुला थांबायला
होत भरपूर बोलायचं तुला
पण शब्द सुचत नव्हते
त्या क्षणाला
मनात बरच दडवलं होतं तू
पण धाडस नव्हतं तुझ्यात
मन मोकळ करायला
त्यात सतत नजर शोधत होती तुझी
पण सापडत नव्हतं
आली होती जे शोधायला
पण भेटल्यावर मी मात्र
लक्ष वेधण्यासाठी दुर्लक्ष करत होती तू
माझ्या असण्याला
नेहमीचच तुझ हे वागण पाहून
बदललं मी स्वतःला
आणि स्वतःच लागलो मी
तुला आठवायला
वाट पहात उभी असायचीस तू
तेंव्हा मुद्दाम थांबायचो
तुला सोबत द्यायला
तुला सुचत नव्हत पण बोलायचं होत भरपूर
म्हणून मीच होतो बोलत
तुला शब्द सुचवायला
त्यावेळी मनात बरच काही होत तुझ्या
म्हणून मी वाट झालो ती
तुझ मन मोकळ व्हायला
सापडत नव्हतो जेंव्हा डोळ्यात तुझ्या
तेंव्हा मी यायचो समोर
तुझ्या नजरेतला मी शोधायला
काळजी आहे तुझी, जगात कुठे ही तू असताना
गरज नाही सखी तुला
लक्ष माझं वेधायला
तू विसरलीस कुठे होती
मला आठवायला
आज हि येत हसू ओठी
नकळतच तुला
मला आठवताना
तुझा हा विसरण्याचा सखे
ओळखून आहे मी बहाणा
फक्त विसरतेस तू मला
मी समोर असताना
पण न विसरता आठवते तू मला
सखी मी नसताना
मला विचारशील तर
मनातच आहेस तू
म्हणून विसरतो कुठे मी
तुला आठवायला
पण आजही तू सांगतेस
न विसरता मला
"सॉरी,हा, विसरले मी
तुला सांगायला "
                                         ----नितीन खंडारे




Saturday, 28 October 2017

सोशल मिडिया ---सोसलं तेव्हढ वापरा

ट्विटर , फेसबुक च्या जगात 
हरवलोय आपण नकळतच 
गूगलवर शोध घेतोय खूपच 
पण सापडत नाही आपणच 
व्हाट्सअपच खूळ डोक्यात 
म्हणून लक्ष असत सतत त्यातच 
कोणी काय लिहिलंय आज 
अर्धा वेळ खपतो त्यातच 
मित्र बनवले त्यावर,खूप अप्रूप त्याच  
पण असतात का हो  मित्र ते आपले खरंच ?
त्या जगात हरवून सतत 
विसरलोय का आपले आप्तच ?
काढतो सेल्फी आपण हसत,पाऊट दाखवत 
बघणारा असतो कॅमेरा फक्त,दुसरा नसतो कोणच 
एकटेपण त्यात असतं पण आपल्याला नाही दिसत 
कारण फुलाहून वेगळी पाकळी भासते या जगातच 
Virtual जग आहे ते 
नव्हे त्यात खऱ्या जगाचा टच 
मोबाईल दिवसभर असतो शेजारी जवळच 
पण मायेचा टच भेटतो कोण्या आपल्यातच 
समजू नका तंत्रज्ञानाच्या विरुद्ध आहे मी कधीच 
करू योग्य वापर त्याचा,संयम ठेवून मनावरच 
कारण जशी अणुऊर्जेचं तंत्रज्ञान देते वीज 
तशीच घडवून आणू शकते विश्वात विनाश तीच 
म्हणून केंव्हा ,कुठे कस ते धन ज्ञानाच वापरायच 
ठरवायचय सदविवेक बुद्धीने फक्त आपले आपणच 
                                                                           ---नितीन खंडारे 

Thursday, 26 October 2017

एक रेल्वेवरचा पूल

रोजचा दिवस अन रोजचीच धावपळ
होती सुरू वर्दळ माझ्या अंगाखांद्यावर,

गप्पाटप्पा ऐकत होतो अशाच अवखळ
की कसा देश चालतोय एका तोंडाच्या वाफेवर,

GST,नोटबंदी अशा कडू औषधाचा प्रयोग कसा फसला,
केला कसा भ्रमनिरास त्याने ऐकू येत होत कानावर

ऐकलं होत कि कायदा चांगला पण अतिघाई,मनमानीने केला घोळ ,
म्हणून अर्थव्यवस्था घसरली ,परिणाम झाला नोकरी उद्योग धंद्यावर

सुरुवातीला मेक इन इंडिया ऐकून बर वाटल हो  थोडावेळ ,
पण त्यातही बाहेरच्याच कंपन्या, काय बोलू या गुंतवणुकीवर ?

आजही बघतोय, स्त्रियांच्या सुरक्षेत ठरतोय आपण कुचकामी भासतो दुर्बल
पण गाईंच्या रक्षणासाठी कुठून येतात हो हे गौरक्षक एवढ्या तत्पर ?

बुलेट प्रूफच जॅकेट सैनिकांना भेटो न भेटो याची कोणाला पर्वा ना आठवण
पण मोजक्या लोकांसाठी असलेल्या बुलेट ट्रेनच कौतुक होतं सर्वांच्या ओठावर

नवनवीन तंत्रज्ञान यावे यात कधीही नव्हत दुमत कोणाचही यावर
पण कोणासाठी,कशासाठी अन कोणत्या स्वार्थासाठी जीवघेण्या किमतीवर ?

मित्रो , फक्त आपल्या मनची बात बरोबर असच होत आलय सर्ववेळ
पण कधी घेतला का त्यांनी कानोसा सर्वसामन्यांच्या मनातील समस्यांवर

अशाच रोजच्या गोष्टी ऐकत होतो त्यादिवशी पण
मरमर के जीना है, सब चलता है येत होत हे कानावर

पण त्यादिवशी अचानक अफवेने ,बेशिस्तीने झाली गडबड
पूल कोसळला म्हणून माजला कल्लोळ , झाली गर्दी अनावर

सारे झाले सैरभैर , पळत इकडे तिकडे , उडाला एकच गोंधळ
जीव वाचवण्याच्या खेळात दबले गेले , रचले गेले माणसांचे थरावर थर

कुणी गुदमरून तर कोणी अडकून फसले तर काही जगण्याच्या प्रयत्नात झाले निष्फळ
पण मी काही करू शकत नव्हतो , बघत होतो फक्त सगळ परिस्थितीसमोर होऊन हतबल

नेहमी श्वास गुदमरून,चेंगरून,जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे ,जगणारे ते
त्यादिवशी चेंगरून गुदमरून जीव गमावून निघून गेले अखेरच्या प्रवासावर 

तो प्रसंग आणि जीव गमावणाऱ्यांना आठवून आजही थरथरतोय हा पूल पायापासून
विचार केलाय का कधी,काय ओढवले असेल त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर ?

त्यादिवशी पूल कोसळला अशी पसरली होती अफवा एका क्षणात  केवळ
पण खरच कोसळलो मी मनाने,खचलो गेलो पाहून मी हा दुर्देवी प्रसंग घडल्यावर

त्यादिवशी मेलेल्यांच्या वरच लोणी खावून, माणुसकीला लाजवून गेले काहीजण
पण काहींनी जपली माणुसकी, देवून हात , करून मात त्या आलेल्या संकटावर

वाईट वाटलं ,या घटनेची पण झाली केवळ राजनीती,विसरून तो भयावह क्षण
फक्त घोषणा आणि आश्वासनच पदरी पडली हाती एवढी दुर्घटना घडून गेल्यावर

माझ म्हणण एकच,
स्वप्न नाहीत मोठी सर्व सामन्यांची , एकवेळ जाणून घ्या त्याचं मन
द्या त्यांना गरजेच्या सुविधा बनवा त्यांच जीवन प्रवास थोडफार सुखकर
काय बोलताय , घ्या ना  थोड हे मनावर ...........

पण सर्व विसरून पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने झाली माझ्या अंगाखांद्यावर धावपळ
प्रश्न पडला मला, विसरून सगळे असे कसे चलता है म्हणत चाललाय हा मुंबईकर ?

अरे ऐक मुंबईकर,
एकदा तरी आवाज उठव या विरुद्ध स्वतःसाठी काढून थोडीशी सवड
दबलेली भावना , राग यांना कधीतरी वाट देवून मोकळी तर तू कर

किती दिवस , तडजोड करत ,चलता है म्हणत, मरमरून जगत तू राहणार
आता तरी सावर
स्वतःला नको पण या अन्यायाला ,भ्रष्टाचाराला,असंवेदनशील नेत्यांना
घालना कधीतरी आवर.....
                                                                                                                     
                                                                                                                    ---नितीन खंडारे

















Monday, 23 October 2017

तिला भेटल्यावर

माहित आहे मला ,
कधीतरी ती गोष्ट येईल ओठावर
पण शब्द अडखळतात ,
तिला बघितल्यावर
आणि कधीतरी ते शब्द चुकवताना
रस्ता बदलतो मी ,
ती भेटल्यावर
सहज सोपी वाटणारी ती गोष्ट
विसरतो , गडबडतो मी
तिला पाहिल्यावर
नव्हे सोपी मनातली ती गोष्ट ,
ती तर आहे एक
दुधारी तलवार
जी सांगितल्याशिवाय
नाही राहवणार
पण सांगितल्यावर
मैत्री गमवायची भीती
सतत सलत राहणार
म्हणून या द्विधा स्थितीत असणाऱ्या,
मनाला आवरतो मी ,
प्रत्येक वळणावर
आणि या ओठावर
रेंगाळणाऱ्या शब्दांना
मी थांबवतो  या अटीवर
तिला सांगूया कधीतरी
योग्य अशी वेळ आल्यावर
कधीतरी सांगेल मनातील ती गोष्ट
तिला भेटल्यावर......
तिला भेटल्यावर.......
                                                     -----नितीन खंडारे

Saturday, 21 October 2017

संधी

वेळ नाही हे सतत कारण
देत होतो मी तिला
पण वेळ थांबत नाही हेच
ठावूक नव्हत मला
सवड मिळाली म्हणून जेंव्हा
आलो तिला भेटायला
तेंव्हा मात्र वेळ नव्हता तिला
साध मला आठवायला ?
वेळ ती गेली होती
तिला मी कधी न दिलेला
ती वेळ परत यावी
वाटत आजही या मनाला
कदाचित वेगळीच वेळ असती
आज माझ्या या आयुष्याला
जर मी असतो तिच्याबरोबर
प्रत्येक महत्त्वाच्या वेळेला
मग तीही असती
मी ही असतो
आजही सोबतीला
पण आता ,
वेळ थांबत नाही म्हणून
निघतोय नवीन प्रवासाला
सतत शोधात चाललोय
त्या संधीला , त्या योग्य वेळेला
भेटेल  ती आणि देईल
कलाटणी माझ्या आयुष्याला
                                             -----नितीन खंडारे



Wednesday, 18 October 2017

कोजागिरीचा चंद्र तू, का म्हणावे मी तुला ?

कोजागिरीचा चंद्र तू,
का म्हणावे मी तुला ?
आईचा भाऊ चंद्र तो,
मामा त्याचा तेंव्हाच झाला !
तरी मग ,
तुलना का करावी त्याच्याशी ,
मामा बोलतो मी ज्याला ?
नको वाटते त्याची सावली ,
तुझ्यावर पडावीशी मला .

"का नको ?" म्हणाली ती
सखी माझी हळुवार ,
मी म्हणालो ,
"डोळ्यांवरचा विचारांचा चष्मा सरकवून ,
   त्या चंद्राकडे नीट बघ मेरे यार...."

किती तरी दिसतील डाग तुला ,
पण नाही जिवंतपणा त्यावर
पण अनुभवायचा तुझा जिवंतपणा ,
हा बोलकेपणा मला आयुष्यभर
अन डाग अच्छे म्हटले तरी ,
डाग नको हवेत कोणते ,
मला तुझ्या नितळ मनावर
कोजागिरीचा चंद्र तू ,
का म्हणावे सांग ना यावर ?

कलेकलेने सुखदुःखाच्या आकाशात ,
पूर्ण साथ न देणारा हा फिरतो चंद्राकार
तसा भास नको पण साथ हवी तुझीच  ,
नेहमी प्रवासात या अनोळख्या वाटेवर
कोजागिरीचा चंद्र तू ,
का म्हणावे सांग ना या जीवन वळणावर ?

यार, १/६ वजन कमी भरतं ,
माहित आहे का त्या चंद्रावर ,
पण वजन तुझं नेहमी वाढू दे ,
तुझ्या कर्तृत्वाचं या भूमीवर
तसा ही तो चंद्र नसे स्वयंप्रकाशी ,
असे त्यासाठी अवलंबून तो सूर्यावर
पण स्वाभिमानी,स्वावलंबी तू शक्ती ,
यशप्रकाश पसरू दे तुझा या जगावर
बघ , नक्कीच  तू ठसा उमटवशील
माहित आहे मला या जगाच्या पाटीवर
मग , ठरव तूच यार ,
कोजागिरीचा चंद्र तू ,
असे म्हणावे का मी तुला जीवनभर ?
                                                       ------नितीन खंडारे 

तुतारी--- केशव सुत

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदूनि टाकीन सगळी गगणे
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज आणुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारिता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल ?

रूढी ,जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती हि हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला !
तुतारीने ह्या सावध व्हा तर !

चमत्कार ! ते पुराण  तेथुनि
सुंदर , सोज्वळ गोड मोठे
अलीकडे ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खां लागूनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध ! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवुनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा ?
विक्रम काही करा , चला तर !

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे ! स्त्रैण न व्हा तर !

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनिया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो ! या त्वरा करा रे !
समतेचा ध्वज उंच धरा रे !
नीतीची द्वाही पसरा रे !
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी , मानव
नसे नियमनासाठी , जाणा
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारूनी दे देऊनी बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव !

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे !
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे !
वीरांनो ! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर हर !

पूर्वी पासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रती दानव फार माजती
देवावर झेंडा मिरविती !
देवांच्या मदतीस चला तर !

                                           ----- केशवसुत


                                          कवितेतल्या काही आवडलेल्या ओळी आणि त्यांचा अर्थ 
   
     "चमत्कार ते पुराण तेथुनि.............धिक्कार अशा मूर्खां लागूनी " अलीकडे  गोड बोलून , चमत्काराच्या बाता ठोकून  खोटे लोक आपली पोटं भरतायत आणि अशा मुर्खांच्या नादी लागणाऱ्या मूर्खांचाही त्यांनी इथे धिक्कार केला आहे. एवढं आपल्या विचारवंतांनी समजवूनही अजूनही आपण बाबांच्या मोठ्या कांड लीला ला बळी पडतोय. ही खूप मोठी आपल्या आजच्या समाजाची शोकांतिका आहे
     "धर्माचे माजवून अवडंबर.........."   धर्माचा वापर करून आपण नीती , न्याय आणि प्रगतीला अडथळे निर्माण करत आहोत. धर्माचा  लोकांना एकत्र आणण्यासाठी वापर  न करता लोकांना विभागण्यात , त्यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी वापरत आहोत. आज आपण भोवताली हे अनुभवत आहोत.
" नियमन मनुजासाठी , मानव , नसे नियमासाठी जाणा..........." नियम माणसासाठी आहेत माणूस नियमासाठी नाही. नियम माणसासाठी त्याच्या सोयीसाठी असतात . पण कधी कधी नियमावर जास्त जोर देता देता  माणसांच्या गैरसोयीच कारण हि तेच नियम ठरतात.याच जिवंत उदाहरण सध्या आपण अनुभवत आहोत. नियम/कायदा  लवकर लागू करण्याच्या नादात लोकांची गैरसोय झाली . नुकसान झालं. चांगला नियम असूनही यतो लोकांपर्यंत पोहोचला नाही.
     "जुने जाऊ द्या मरणा लागूंनी , जाळुनी किंवा पुरुनी टाका" . पण  अजूनही आपण जुन्या अनिष्ट  रूढी परंपरा यांना चिकटून आहोत. त्यांचा  त्याग करून , यांना जाळून दूरदृष्टी ठेवून खांद्याला खांदा लावून ,बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची कास धरून आपल्याला पुढे जायला हवे. असे मत कवीने व्यक्त केले आहे.
     शांत बसून मेद म्हणजे चरबी वाढवू नका. सतत न थकता काम करा. रोज कालच्या पेक्षा आज जोमाने काम करा. आणि आयुष्य सुंदर बनवा.  समता आणण्याचा आणि समाजात असलेल्या वाईट प्रवुत्तीवर मात करण्यासाठी एकत्र येऊन  त्याविरुद्ध लढण्याचं आव्हान येथे कवितेत कवीने केले आहे.
    अशाप्रकारे अंधश्रद्धा , जुन्या अनिष्ट प्रथेविरुद्ध , चालीरीती विरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी , समाजातील नीतिमत्ता जपण्यासाठी , कर्म प्रधान होऊन दूरदृष्टी ठेवून एक नवा समता प्रधान समाज निर्मितीसाठी एक रणशिंग , तुतारी कवीने कवितेद्वारे फुंकली आहे.  
     आजच्या परिस्थितीला हि कविता समर्पक  वाटते. अजूनही आपण आपल्या थोर विचारवंतांचे विचार आपल्यात, या समाजात रुजवण्यात कमी पडलो आहे हे ही प्रकर्षाने जाणवते. चला , तर मग या कवितेतील ऊर्जा घेऊन आपण आपल्या समाज सुधारकांना अपेक्षित असा समाज घडवूया.
.

Wednesday, 11 October 2017

गिफ्ट अ स्माईल

     मराठी ब्लॉग आणि इंग्रजी शीर्षक? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. पण त्याला कारण ही तसेच आहे.
     तर रविवारी मला काही करून मित्राला भेटायचं होतं आणि तसा संदेश ही मी व्हाट्सअप्प वर पाठवला. लगेचच त्याचा कॉल आला. " अरे कुठे आहेस ? जमलं तर ये ना नेरुळ मध्ये दान पारमिताच्या गायनाच्या प्राथमिक स्पर्धेला. इथे परीक्षक म्हणून काम पाहतोय मी. अरे ये."
     मी त्या ठिकाणी जाणारच त्यामुळे मी जाणार की नाही हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. पण हा प्रश्न नक्की पडला असेल की दान पारमिता आणि गायनाची स्पर्धा हे आहे काय?
     दान पारमिता ही एक सेवाभावी संस्था आहे. सेवा भावी संस्था? हो सेवाभावी संस्था. मला माहित आहे की सध्या या देशात दुष्काळामुळे पिकत नाही पण तरी एका पिकाचं उत्पादन अमाप आहे , ते म्हणजे सेवाभावी संस्थाचं. इकडे आधार कार्डचा फायदा सामान्य माणसाला होवो न होवो पण सेवाभावी संस्थाचा आधार घेऊन नेता ते अभिनेता पासून सगळेच दानशूर असल्याचा आव आणून आपल्या प्रसिद्धीला कळस मात्र चढवतात. "अरे किती चांगलं काम करतात. नका करू रे ."अशी बोलण्याची वेळ कधी तरी  आपल्यावर येणारच आहे, यांचा हा मोठा खोटा दिखाऊपणा पाहून आणखी काय?
     पण त्यातही काही अपवाद आहेत. त्यातली ही एक संस्था. आता तुम्ही बोलाल मी यांचा प्रचार करतो. पण मी काही कोणता मोठा प्रसिद्ध व्यक्ती नाही जो मी बोलेल आणि तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवालं. हो ना. मग असं असेल तर कोणावरही विश्वास ठेवू नका, डोळे झाकून. भलेही तो मी असो की कोणता मोठा व्यक्ती.
     असो. तर मी त्या पत्त्यावर पोहोचलो आणि माझा मित्रच परीक्षक असल्यामुळे मला ऑडिशन प्रत्येक्षात बघण्याचा अनुभव मिळाला.
     अनुभव आणि वयाचा संबंध नसतो असं काही जण म्हणतात. आणि त्या स्पर्धेत लहान मुलांची गायनाची प्रतिभा पाहून याचा प्रत्येय आला. काही जण गाण्यात भल्या भल्यांना ऐकणार नाहीत असे होते तर त्यात एक लहानगा असा होता जो परिक्षकांनाही ऐकणारा नव्हता. परीक्षकाने थांबवल्यानंतर सुद्धा हा चिमुरडा गात राहिला तेही गाणं पूर्ण ऐकवून जाणारच याच एका जिद्दीने . लहान मुलं जिद्दी नसणार तर कोण असणार ?
     या जिद्दी शब्दावरून आठवलं. आठवलं काय तर हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. अहो मुलंच जिद्दी असतात असं आपल्याला वाटतं. पण जिद्दीपणा अंगात असावा लागतो तेही आयुष्य अर्थपूर्ण बनवायला.असेच जिद्दी  दिव्यांग स्पर्धक डोंबिवली , विरार या सारख्या ठिकाणावरून आपलं गाणं सादर करायला आले होते. आणि  मला वाटतं गाणं सादर करणं हेच त्यांचं स्वप्न होतं . गाणं झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान बघण्यासारखा होता. त्यावेळी त्यांच्या जिद्दीला सलाम करावसा वाटलाच पण त्यांच्या गोड गळ्यालाही दाद द्यावीशी वाटली आणि ती मी दिलीही.
     आपण थोड्याश्या अडचणींनी बिथरून जातो. घाबरतो . पण हे पाय नसून आयुष्यात सतत पुढे चालत राहतात. हात नसून मोठी आव्हान पेलून जातात. दृष्टी नसूनही आयुष्यात दूरदृष्टी ठेवतात. हे स्पर्धक फक्त जिद्द मनात रुजवून नाही गेलेत तर शिकवूनही गेलेत जीवन जगणंही .
     जीवन जगायचं तर आताच जगा . नंतर वय झाल्यावर जमणार नाहीत अशा म्हणणाऱ्या लोकांना खोटं ठरवणारे चिरतरुण स्पर्धक ही इथेच भेटले. गाणी गाण्याच्या आनंदाबरोबरच जीवन जगण्याचा आनंद ही ते देऊन गेलेत. आजच्या युवकांसाठी प्रेरक ठरतील असेच ते होते.
     पण युवा स्पर्धक ही गायनाच्या बाबतीत मागे नव्हते . त्यांच्यातली धडपड , उत्साह आणि  त्यांच्यातली नव ऊर्जा दिसत होती. प्रत्येक स्पर्धक इथून आनंदी भावाने गेला. बघायला गेलं तर ही स्पर्धा लक्षात राहील अशीच होती. नक्कीच हि स्पर्धा पुढच्या फेरीत हे स्पर्धक नव्या उंचीवर नेतील यात शंका नाही.
     स्पर्धक संपले आणि स्पर्धा संपली तेंव्हा मी आणि इतर मंडळी निवांत झालो. दिवसभरात घडलेले प्रसंग आठवून माझ्या चेहऱ्यावर नकळत एक हलकंसं हसू आलं . मनात आनंद आणि समाधानाचे भाव आलेत. हाच आनंद आणि समाधान मी दिवसभर धडपड करून स्पर्धा यशस्वी करणाऱ्या दान पारमिताच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर पहिला. हाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहता पाहता माझी नजर दान पारमिताच्या ब्रीद वाक्यावर गेली " गिफ्ट अ स्माईल ."
     गिफ्ट म्हणजे भेट. ती पैशाचीच असते असं नाही . तर आनंद देऊन आनंद घेण्याचीही असते. कोणाच्या चेहऱ्यावर आनंद बघणं किती सुखद असतं नाही का ? आणि हाच आनंद आपल्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आलाय याच समाधान काही औरच असतं. नाही का? स्माईल गिफ्ट दिल्यामुळे स्माईलच रिटर्न गिफ्ट म्हणून मिळतं हे त्यावेळी अनुभवलं.
     पुढच्यावेळी जर कोणाला भेटला तर त्यालाही द्या गिफ्ट म्हणून एक स्माईल. ती मोफत आहे त्यामुळे कंजुषी दाखवू नका.
                                                                                                                     -----नितीन खंडारे

Monday, 9 October 2017

प्रेम म्हणजे ? भाग २ (मित्राचं उत्तर )

मित्र उवाच ,
        प्रेम म्हणजे ,
एकमेकांची जन्मभराची साथ ,
संकटाच्या काळात ,
एकमेकांना सावरण्यासाठी ,
दिलेला धीराचा हात ,
अडचणींवर करत मात ,
घालायचा असतो संसाराचा घाट ,
रुसवे फुगवे , सावरत ,
एकमेकांच्या विश्वासावर ,
रचायचा असतो हा ,
संसाराचा परिपाट ,
संसाराची दिशा अन दशा ,
यात असतो दोघांचा हात,
संसार रुपी रथाला दाखवतात ,
फक्त हेच चांगली वाट ,
मित्रा ,
अशी हि आहे ,
प्रेमाची दुनियादारी ,
तुझी अजूनही आहे मात्र ,
याबतीत पाटी कोरी ,
मी म्हणालो ,
प्रेमाची पाटी अजून ,
जरी असली कोरी ,
पण कधी तरी सुरु होईल ना यार ,
मेरी भी प्यार वाली लव्ह स्टोरी ......
                                                     -नितीन खंडारे

प्रेम म्हणजे? भाग १

प्रेम कधी होत नाही ठरवून ,
प्रेम करायचं नाही म्हटलं तरी ,
हा योग येतो जुळून ,
प्रेमाचं हे समीकरण कधी ,
उलगडलंच नाही ,
प्रेम म्हणजे काय असतं ,
हे मला कळलंच नाही ,
कोणासाठी प्रेम म्हणजे TIME PASS ,
तर कोणासाठी नव्या जीवनाचा प्रवास ,
प्रत्येकाला हवा हवासा वाटतो ,
हा प्रेमाचा सहवास ,
या प्रेमात पडायला गरुत्वाकर्षण हि ,
नसतो जबाबदार ,
तरी असा कसा जुळून येतो ,फुलतो ,
हा प्रेमाचा बाजार ,
करंट FLOW करतो ,
पॉसिटीव्ह कडून निगेटिव्ह कडे जर ,
असाच नसेल ना प्रेमाचा हा ज्वर ,
मॅग्नेट मध्ये नेहमी ATTRACT करतो ,
S पोल कडे N पोल ,
असाच तर नसेल ना प्रेमाचा झोल ,
घेतला मी जर KBC सारखा ऑडियन्स POLL ,
तर कळेल का मला प्रेमाचा झोल ,
अशा किती तरी प्रश्नांचा होता ,
डोक्यात घोळ ,
मित्राच्या उत्तराने प्रेमाला भेटला ,
एक आगळा वेगळा मोड ,
मिळाली त्याला 'संसार' सारख्या ,
सिरीयस शब्दाची जोड ........
                                             -नितीन खंडारे 

सखी

सखी , तुझे निरागस , खोडकर डोळे
तरी तुझ्या पापण्या ओलावलेल्या का वाटतात ?
तुझे सुंदर स्मित  हसू ,
तरी पण त्यामागे वेदना का जाणवतात ?
दिसते जरी तू वरून बिनधास्त , मोकळी,
तरी पण असं का भासतं ,
काहीतरी दडवलय तू मनात ?

सखी , तुझ्या डोळ्यातल्या ओल्या पापण्यांनी ,
मन जातं गहिवरून ,
तुझ्या स्मित हास्यामागील वेदनांनी ,
का मन हेलावतंय आतून ?

सखी, तू जशी आहेस ,
तशीच आहेस ,
छान , हळवी
कोणासाठी बदलू नकोस ,
कोणासारखी होऊ नकोस ,
तू तुझीच ओळख बन
आणि जगाच्या रंगभूमीवर या ,
वेगळस एक नाव कोर ........
                                           -नितीन खंडारे