Thursday, 28 December 2017

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू
कळली आहेस मला तू

खुललेला चेहरा ,
गुलाबी हसू
निसर्गाने पांघरलेलं
सुंदर रूपच जणू
पाहून डोळ्यातला
निरागस आनंदी ऋतू
अनुभवतो मी सुंदरसा
वसंत ऋतूचा बहर तू

मनातून हळवी
आहेस जराशी तू
मनातल्या नात्यांचा ओलावा
डोळ्यात लागतो दिसू
ज्या क्षणी व्यक्त होतेस
डोळ्याच्या ओल्या पापण्यातून तू
भासतो  त्यावेळी वर्षा
ऋतूतील हळवासा नभ तू

नाकावरचा राग तुझा
जेंव्हा लागतो मला कळू
तेंव्हा कळत नाही
राग तुझा कसा मी शमवू?
कळत नाही डोळ्यातला
तो वणवा कसा शांत मी करू?
जाणवतेस तेंव्हा ग्रीष्म ऋतूतला
सतत वाढणारा पारा तू

दूर जाताना वाटते भीती
कुठे तरी आपण हरवू
आयुष्य भासे तेंव्हा
रुक्ष निसर्गच जणू
तेंव्हा डोळ्यातले भाव तुझे
सांगतात इथेच थांबू
पण दूर असताना ही आठवून
ते भाव दिसे शरद ऋतूची पौर्णिमा तू

जेंव्हा कधी मी चिडतो
पाहतो तुला रागावू
तेंव्हा तुझ्या शब्दांच्या गारव्याने
राग लागतो माझा निवळू
डोळ्यातला तो थंडपणा
जरा दे मला अनुभवू
आठवू दे थंड असा हेमंत-शिशिर ऋतू

तुझ्या डोळ्यातले पाहून ऋतू
खरचं नव्याने उलगडली आहेस मला तू....

                                                    -----नितीन खंडारे






Thursday, 21 December 2017

नजर

नजरे नजरेत फरक
असतो फार
कोणाला माधुरी तर कोणाला
आवडते दुसरी नार
कोणासाठी कोणी देव तर कोणासाठी
तोच दानवाचा अवतार
विचारांच्या चष्म्यातून ह्या
समजून घ्या जगाचा हा सार
चष्म्याविना त्या नाही कळणार
समजणार हा संसार
म्हणून बुद्धीच्या कसोटीवर जाणून घ्या
प्रत्येक प्रश्न अन विचार
सापडेल तुम्हाला मार्ग नवी, दिसेल चष्म्यातून
पारदर्शक अन स्वच्छ विचारांची खाण
आणि हो जगाला सामोरे जाताना
वापरा नक्की हे गवसलेले ज्ञान
जे करेल रोजच्या जीवनातील
अडचणींची नौका पार
                   ---- नितीन खंडारे

प्रेम

पृथ्वी आणि चंद्र असले जरी दूर
तरी बांधली आहे त्यांची गाठ
गुरुत्वाकर्षणाच्या नाजूक बंधनावर 

तसेच,
नकळत बांधले गेलेत आपले सूर
धडधड करणाऱ्या हृदयात
प्रेमाच्या मधुर ठेक्यावर 

म्हणतो आइनस्टाइन ,
प्रेमात पडायला गुरुत्वाकर्षण
नसतो जबाबदार 
मग प्रश्न पडतो की प्रेमात पडतो कसे ?
कसे जुळतात हे तार?

नंतर कळले उलगडले
हे गणित मला हळूवार
कळले प्रेमात पडायला कारणीभूत आहे
फक्त तुझ्या एका कटाक्ष नजरेची धार

                                           ----नितीन खंडारे




Tuesday, 19 December 2017

पाण्यासारख मन

बर्फासारखं एकाजागी जमून
थांबायचंय नाही मला

मनाचा झालेला बर्फ वितळवून
पाण्यासारखं खळखळ वाहायचंय मला

मनाचं गढूळ डबक बनून साचणं
जमणार नाही कधी या मनाला

डोंगर दऱ्या खोऱ्या पालथ्या घालतं
फक्त पुढे पुढेच चालायचंय मला

हिंडायचंय हे जग , अनुभवायचं रोज
माझ्यातला मी नव्याने मला

आणि शेवटी खाऱ्या समुद्राला भेटून
गोड मनाने गोड बनवायचंय त्याला
---- नितीन खंडारे

Saturday, 16 December 2017

जगणं शिकतोय तुला पाहून

जगण्यातला आनंदच
बसलो होतो मी गमावून
पण आता जगणं नव्याने
शिकतोय मी तुला पाहून

मस्ती, धिंगाणा, पागलपंती
गेलोच होतो मी विसरून
पण आठवलं ते सगळं
तुझा मॅडनेस अनुभवून

रोजचंच होत ते जगणं
मन स्वतःच मारून
पण जगायचं कसं सांगितलं
तू ते प्रत्यक्षात दाखवून

जगण्यातला बिनधास्त पणा
जाणवला मला तुझ्यातून
जगणं कसं सुंदर असावं
ते दिसलं मला त्यातून

रस्ता मी भटकलो भरपूर
जीवनाचा खरा आनंद सोडून
भटकता भटकता सापडला
मला नकळतच तुझ्या रूपातून

कृत्रिम जगात जगत होतो मी
जगण्याचा खरा अर्थ हरवून
दिसला तुझ्या डिकशनरीत तो
सांग अर्थ त्याचा कधीतरी
मला समजावून

                                                      --- नितीन खंडारे

Friday, 8 December 2017

दे जरा इकडे चष्मा तुझा

गुगल सारखं
तुझ्या मनावरचं पेज
चष्मा तुझा
शोधेल का गं जरा ?

दे जरा इकडे
चष्मा तुझा
पाहू दे त्यातून
काय दिसतंय का मला ?

रोजची तुझी धावपळ
घर आणि ऑफिस अशी पळापळ
दमछाक तुझी त्यातून
कळते का मला ?

गर्दीने तुंबलेली लोकल
तुझा दगदगीचा प्रवास
त्यात गुदमरलेला श्वास
तो श्वास समजेल का मला ?

अन दिवसाच्या शेवटी
घरची तीच कामं
थकवा ,कंटाळा आला तरी
जमेल का गं मला ?

कधी दुखावलं असेलं
भावूक मन तुझं
तेंव्हा त्या निघालेल्या अश्रूंना
त्या चष्म्यातून प्लीज अनुभवू दे मला

चांगलं की वाईट कशी ठरवते तू
समोरच्या व्यक्तीला
चष्म्यातून तुझ्या
तू पाहू देशील का मला ?

डोळ्यातला आनंदीपणा
तुझा खोडकर पणा
यार , दिसेल का
तुझ्या चष्म्यातून मला ?

डोळ्यात तुझ्या
प्रेमाची ती सावली
यार ,ओळखता येईल का
तुझ्या चष्म्यातून मला ?

तुझ्या मनावरचे स्टेट्स
नसेल प्रोब्लेम तुला तर
त्या चष्म्यातून
वाचू का मी जरा ?

कदाचित लपलेलं
तुझ्या नजरेतलं माझं स्टेट्स
त्या चष्म्यातून
पूर्ण आणि स्पष्ट दिसेल ना मला

दे जरा इकडे
चष्मा तुझा
पाहू दे तुझ्या नजरेतून
हे सगळं जग मला
                                           -----नितीन खंडारे


















Thursday, 7 December 2017

ऐकणा तू जराशी

ऐकणा तू जराशी
रुसू नकोस
बोलना तू माझ्याशी
मन मोकळ होत
फक्त तुझ्यापाशीच
म्हणून बोलना
बोलू मी कोणाशी ?
कानमंत्र देणा मला
कसं वागू मी तुझ्याशी ?
माहित आहे तुझा राग क्षणभरचा
साखर पाण्यात विरघळते जशी
पण धीर संपत चालला माझा
शब्द आणणा तू ओठाशी
नाही बोलायचं कधीच
असं ठरवलंय का तू मनाशी ?
असेल तरी विसर राग
नसेल तर बोलना तू जराशी
ए ,ऐकणा तू जराशी
                                           ----नितीन खंडारे
 

रंग तुझा

अवखळ नदीचा
रंग निळा तू
हिरवा रंग नसात
तुझ्या संगिनी
ढग काळे गुंतवते
केसामध्ये तू
त्या काळ्या डोळ्यात
तुझ्या हरवलो मी
आहेस पिवळ्या
सोन्यासारखी मनाची तू
पण रागवताना दिसतो
तुझ्यात लाल रंगाची लाली
आहेस शुभ्र मनमिळावू
मनाची तू
जशी भासतेस सगळे सात रंग
सामावले तुझ्यातचं सखी
                                        ----नितीन खंडारे