Monday, 18 May 2020

आई - बाबा

सतमार्ग कधी कळला नसता
कदाचित रस्ता ही चुकला असता
जर नसते तुमचे मार्गदर्शन ना संस्कार ,
ना खाल्ल्या असत्या आमच्यासाठी त्या खस्ता
तर काय झालं असतं माझं जर तुम्ही
कदाचित माझे आई बाबा जर नसता
असे अनेक प्रश्न पडतात
मनात येतात, विचार करता करता
आहात आई बाबा तुम्ही माझे सांगेल गर्वाने या जगाला
चालेल नेहमी तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जगता जगता
असेल कुठे माहित नाही तो परम परमेश्वर
अन या संपूर्ण जगाचा, विश्वाचा दाता
पण आभार मानतो त्याचे कारण दररोज भेटतो
तुमच्या रुपात आई बाबा जगाचा तो कर्ता
--- नितीन खंडारे

Sunday, 17 May 2020

ना जाणे का? ब्रह्मांड कार्य आणि जीवन संबंध

पृथ्वी का फिरते स्वतः भोवती अन सुर्या भोवती या अवकाशात?
गुरुत्वाकर्षणाद्वारे सृष्टीला जगवायचा खेळ न जाणे का वाटतयं  रंगला त्यात?
न जाणे पृथ्वी का तरंगतच फिरते ना पडते खाली ना उडते वरती या सौरमंडलात?
कारण जीवन समतोल साधण्यासाठी तरंगत फिरते पृथ्वी आकाशगंगेत गुरुत्वाकर्षणामुळे  वाकलेल्या time space च्या fabric च्या फंदात
भीती का नसते पृथ्वीला या पडण्याची, हरवण्याची या अथांग ब्रह्मांडाच्या पसार्यात?
कारण माहित आहे तिला चांगल्या परिक्रमणाच्या मार्गावर कोणी तरी आहे तिचा हा तोल सांभाळण्यात (space time and gravity)
फिरते सुर्याभोवती पृथ्वी आणि फिरतो चंद्र पृथ्वी भोवती आणि फिरते आकाशगंगेच्या मध्यबिंदू भोवती ही आपली सौरमाला या क्षणात
फिरतात असेच ग्रह तारे असे बिंदू जोडत,नाते गुंफत अन वाहून नेतात स्वतः ला सगळे प्रचंड अश्या ब्रह्मांड कार्यात
तसचं कोणाच जीवनही आपल्या भोवती, आपलं नात्यांभोवती आणि इतरही आयुष्य  फिरत असतील या विश्वात
समतोल साधतोय आपण जीवन गंगेच्या प्रवाहात या, अडकलोय वेळेच्या या बंधात
नवी माणसे ,नवी नाती ,मार्ग नवे भेटत जातात आयुष्याची परिक्रमा करता करता या जीवन प्रवासात
त्या time space वरच्या विश्वासाने पृथ्वी झोकून देते स्वतःला तसेच का झोकून देतो जीवन आपण त्याच्यावरच्या विश्वासात ?
पण त्यामूळे ना पडण्याची भीती न काही गमवायची, भेटत जातात मार्ग नवे चालता चालता विश्वानिर्मात्याच्या आधारात
गणित उलगडण अजून बाकी आहे ब्रह्मांडाच,पण त्याचा नियम आपल्या जीवनाला लागू आहे वाटते या अंतर्मनात
खेळ हा कोणता आहे हे कळले न कुणा पण नियम विश्वाचे हे गम्मत आहे सूत्र त्याचे हळूवार उलगडण्यात

  • --- नितीन खंडारे

Thursday, 14 May 2020

थांबणे नको आता

थांबणे नको आता
चालणेच हवे आहे
दूर जाता जाता
माझ्या जवळ मीच आहे
नवे जग जोडता जोडता
जुने सोडणे भाग आहे
पुढे चालता चालता
हात द्या त्यांना जो सोबत आहे
जो नाही बरोबर आता
त्याला आठवणे व्यर्थ आहे
कुठे ही जात नाहीत त्या वाटा
भेटते पुन्हा तुला जे तुझेच आहे
जे आहे त्यांना सोबत घेता
फक्त आपल्याला लढायचे आहे
जीवनाच्या रणांगणात येता
लढने हे कर्म प्राप्त आहे
--- नितीन खंडारे

Monday, 4 May 2020

स्त्री आदर

आई , बहिण, मैत्रिणींच नातं बोलून सांगता येत नाही आहेत स्पैशल किती!
ना वाव, ना दाद याची अपेक्षा ठेवता त्या राबतात न थकता  कुटुंबासाठी
पण आपलेच न विचार करता,रागात, त्रास देतात, वार करतात का त्यांच्या मनावरती ?
आपलं महत्व वाढाव म्हणून की कोणा दुसर्याचा राग काढता का हो तुम्ही तिच्या वरती?
घराला जोडणारी ती,कधी वाचा तिला, महत्व जाणा तिचं,जीवन घडवणारी, संस्कार पेरणारी शक्ती
त्यांना समजून घ्या, करा मोकळं मन, ओळखा त्यांची खरी मनाची स्थिती
बघा, हळू हळू उलगडेल त्यांच कोडं, आणि नंतर समजेल तुम्हाला ती
--- नितीन खंडारे

नातं Quarantine च्या काळात

आता हे चार भिंतींच घर
वाटतय आज जिवंत
नात्यांना ही गुलमोहर फुलला
ना राहिली मनात कोणती खंत
रुसवे , फुगवे होतायेत नात्यात
पण फुटला त्यांना नवा मधुर कंठ
जगतोय दिलखुलास मन आतून
बाहेरच वातावरण असून ही अशांत
नात्यांच्या विश्वात आज गरजा आवरून
तडजोड करुनही जगतोय आपण निवांत
जरी स्वतंत्रता हरवलीय आज फिरण्याचे
पण तरी भेटले ते स्वातंत्र्य कैद अशा नात्यांत
--- नितीन खंडारे

Sunday, 3 May 2020

जगण्यावरती

कोणाच्या मनाशी खेळणं, दुर्लक्ष करुन
लक्ष्य वेधण सोपं वाटतं कोणासाठी (१)
पण
माहित नाही त्यांना तेच खेळतात स्वतः शी
गमावतात सर्व या जीवनाच्या वाटेवरती (२)
भटकलेल्या अशांना भेटत नाही मार्ग,
अडकतात भुलभुलैयात,हरवून खरी नाती(३)
जरी या खोट्या जगण्यात वाटतं असेल,
भासत असेल सुख त्या क्षणापुरती (४)
नष्ट होईल हे क्षणभंगुर सुख, मिसळेल
स्वार्थाच्या मातीत, देईल मनाला ती अशांती(५)
समजून घ्या, अर्थ द्या जीवनाला,
जगू नका जीवन तुम्ही जनावरांसारखी(६)
हळू, हळू समाधान लाभेल, होईल शांत मन
जेंव्हा शोधाल तुम्हालाच तुम्ही (७)
मग बघा भटकणार नाही मन हे बावरे या
जीवनरुपी वेड्या वाकड्या वळणा वरती (८)
---- नितीन खंडारे