Sunday, 11 February 2024

अर्थ अनर्थ

 किती अर्थ अन अनर्थ निघतात 

आपल्या बोलल्याने 

बोलतो चांगल्यासाठी पण चुकीचं ठरतो 

एका शब्दाने

बोचतात तेच शब्द जरी असले जरी ते

चांगले एका अर्थाने

समजून घ्या, नको तुटू द्या नाते

एका शब्दाच्या अनर्थाने

--- नितीन खंडारे