Tuesday, 11 February 2020

बाबासाहेब

बाबांच्या चष्म्यातून जग
तुम्ही अनुभवलंय का कधी?
मग कळेल कसा त्यांचा संघर्ष
समाज क्रांती आणण्यासाठी?
इतर मुलांपासून वेगळं बाहेर बसुन वर्गाच्या
शिक्षण घेतलय का कधी ?
मग कसं कळेल तुम्हाला काय काय सहन केलय
शिक्षणाच्या महामेरुने तुमच्या साठी?
घश्याला कोरड पडल्यानंतर पाणी पिताना
बाबाना आठवले का कधी?
आठवा,वाचा बाबाना स्वतः कोरडे राहून
जे झिजले समाजासाठी
शिका संघटित व्हा संघर्ष करा
कळलच नाही लोको हो विसरले तुम्ही कधी?
उठा जागे व्हा आता तरी
त्यांनी बघितलेल्या राष्ट्र निर्माणाच्या स्वप्नांसाठी
स्वाभिमान, स्वावलंबनाची शिकवण दिली त्यांनी
आठवणीत नसेल कदाचित  तुमच्या कधी?
जागवा तो स्वाभिमान
धरुन स्वावलंबनाची कास देश विकासासाठी
काही दशका पूर्वीच्या स्त्रियांची स्थिती
आठवते का हो तुम्हाला कधी?
आठवेल कसे तुम्हाला ज्या बाबानी दिले पंख
तिला आकाश भरारी साठी
जाती धर्म भेद होता भयंकर
तेंव्हा ना होता हक्क कधी काळी
समाज कंटक वृत्तीशी लढले ते
 नवा शक्तीशाली समाज घडवण्यासाठी साठी
बाबांच्या चष्म्यातून वाचलय का
भारताच संविधान कधी?
वाचा बाबानाही
धर्म जाती चा चष्मा न घालता राष्ट्रहिता साठी
 ---- नितीन खंडारे