Thursday, 24 May 2018

फक्त तू आणि मी

वाट पाहत होतो तुझी
पण तू दिसलीच नाही
थांबावं कि निघावं
तेच कळत नाही
तरी तुला शोधतोय हिमतीने
पिंजून दिशा दाही
कदाचित भेटेल तू , हि आशा आहे
या वेड्या मनालाही
तुझ्या साठीत भेटली तू जरी
तरी गम नाही कुठलाही
चुकून जगातून निरोप घेतला नसेल तर
त्यावेळी भेटेन तुला मी
फुलपाखराच्या आयुष्याएव्हढ का असेना
असू सोबत तेंव्हा फक्त तू आणि मी
                                                      --- नितीन खंडारे