Thursday, 29 March 2018

प्रेम आणि बिग बँग

विचार केलाय कधी
का भेटलो आपण?
काहीतरी असेल ना यार
कारण त्याला पण
कदाचित आपल्यात आहेत
बिग बँग अगोदरचे ते अणू कण
जे दुरावले होते त्यावेळी पण अजूनही
त्यांच्यात आहे ती ओढ ते आपलेपण
म्हणत असतील आता भेटलो आहोत
तर आता का रहावे वेगळे आपण
म्हणून नेहमीच आतुरलेले असतात
नियंत्रण नाही माझ्यातल्या त्या कणांवर
जी सतत ओढ आहे माझ्यातल्या कणांना
आहे ती तुझ्यातल्या त्या कणांना पण
कितीही दूर असो तुझ्या माझ्यातले
बिग बँगमुळे दूर झालेले ते अणू कण
विश्वातल्या दोन वेगळ्या टोकांवर असले
तरी असते त्यांच्यात ती ओढ आपलेपण
जसे वागतात तुझ्यात ते कण तसेच
समान वागतात माझ्यात ही प्रत्येक क्षण
पण एक सारखे कसे वागू शकतात एकाच वेळी
वेगवेगळ्या ठिकाणी असलेले तुझ्या माझ्यातले कण?
विज्ञानाकडे ही उत्तर नाही याचे
QUANTUM ENTANGLEMENT च्या या प्रश्नावर
पण वर्षानुवर्षे एकमेकांचे पाठलाग
करताहेत तुझ्या माझ्यातले ते कण
आता कुठे तरी भेटताहेत,भेटू दे
होऊ दे त्यांचे मधुर मनोमिलन
--- नितीन खंडारे

Saturday, 17 March 2018

बघ जमतंय का तुला

बघ जमतंय का , मला विसरून जरा
माहित आहे जमणार नाही हे तुला
कित्येक लोक आले गेले असतील पण
तुझ्या आयुष्यात त्यांची पाहुण्यासारखी तऱ्हा
विसरून हि जाशील सहजच त्यांना
यात तिळमात्र शंका नाही मला
पण माझ्या येण्याने झालेला मनाचा गोंधळ चालेल
माझ जाणं परवडणार नाही तुला
मोबाईल उचलताना , वाचताना ,विचारात
तुझ्या सहजच नकळतच आठवेल मी तुला
एक वेळ वाटेल बोलले असते तर बर वाटल असत जरा
पण वेळ निघून गेल्यावर शोधून सापडणार नाही तुला
आयुष्याभरासाठी लक्षात राहील मी तुझ्या
तरी बघ जमतंय का तुला,मला विसरून जरा
मनातच आहे तरी चल आता शोध तू मला
                                                                         ----नितीन खंडारे